
Project Asmi
An Initiative by Dr. Kalpana Vyavahare Foundation

Impact
Project Asmi, a cornerstone initiative of the Dr. Kalpana Vyawahare Foundation, embodies a transformative vision for the emotional and psychological development of children. For students, Project Asmi isn't just a program; it's a gateway to self-discovery and emotional resilience. Through innovative methodologies, it nurtures their holistic growth, providing a safe space for expression and fostering a deep connection with nature and creativity.
Facilitators are not mere instructors but catalysts of change, engaging
in a reciprocal exchange of knowledge and energy. Their dedication and expertise amplify the program's impact, empowering students to realize
their potential beyond the classroom.
Interns, too, find profound enrichment in their journey with Project Asmi. Their interactions with students become pivotal moments of personal and emotional growth, shaping them into empathetic and socially conscious individuals.
This ripple effect extends beyond individuals to society at large. Project Asmi creates a culture of empathy and empowerment, where each student emerges as a beacon of positivity and progress, enriching the fabric of our communities with their newfound confidence and resilience.



Schools


“प्रोजेक्ट अस्मिमुळे मला शाळेत जाऊन मुलांसोबत काम करायची संधी मिळाली. मुलांच्या अभ्यासक्रमातील विषयांपलीकडे जाऊन त्यांच्या भावनिक- मानसिक विकासाचा विचार करून आपण त्यांना शिकवू शकतो आणि त्यांना व्यक्त व्हायला संधी देऊ शकतो हे समजले. मुलांकडे खूप काही व्यक्त करण्यासारख्या गोष्टी आहेत पण त्याची त्यांना जाणीव व्हावी यासाठी प्रोजेक्ट अस्मि ची खूप मदत झाली. अस्मि मध्ये दिलेली प्रत्येक सत्रातील संदेश मुलांपर्यंत पोहचवताना खूप छान अनुभव आला. मुलांनीही खूप छान प्रतिसाद दिला. अस्मि बरोबर काम करताना खूप काही शिकायला मिळाले मुलांसोबत interact होता आले, त्यांना जवळून observe करता आले व अस्मिचा माझा अनुभव खूप छान होता.”
प्रिया बेल्हेकर – ज्ञानप्रबोधिनी
सर्वांत प्रथम मी *Project Asmi* चे खुप खुप आभार मानतो 🙏🙏. अत्यंत सुंदर आणि वेगळा अनुभव दिला जो शब्दात व्यक्त करणे खरेतर कठीण...!
इयत्ता ३ रीच्या मुलांसोबत विविध सत्रांमध्ये खेळ, कृती , गाणी , गोष्टी यांच्या माध्यमातून संवाद साधता आला.
सत्र कशी घ्यायची ? मुलांशी कसं जुळवून घ्यायचे ? आपलं मत कसं मांडायचं ? इतरांचं मत कसं ऐकून घ्यायचं ? अशी अनेक महत्वाची जीवन कौशल्ये संस्थेच्या प्रक्षिक्षण कार्यक्रमातुन आमच्यात रोवली गेली. शाळेला भेट देणे, मुलांशी ओळख करून घेणे , वर्ग शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी संवाद साधणे. यातून अनोळखी व्यक्तींना प्रथम भेटताना जाणवणारी भिती दुर करता आली. सुरुवातीला काहीशी बुजरी असणारी मुले सत्राच्या शेवटी समारोपाचा करून देईनात. त्यांना अजून शिकायचे होते. मुलांसोबतच या उपक्रमामुळे आमची कौशल्ये विकसित होत गेली. एकूणच हा विलक्षण अनुभव होता. या सगळ्यासाठी आम्हाला सदैव आपल्या ऋणात राहायला आवडेल .
बळीराम कैलास उजाड.- मॉडर्न कॉलेज
प्रोजेक्ट अस्मि - एक वेगळा अनुभव...!
प्रोजेक्ट अस्मीमध्ये मला इयत्ता चौथीच्या वर्गातील मुलांचे सत्र घ्यायचे होते. चौथीच्या वर्गात एक मुलगी learning difficulty असलेली होती . त्या मुलीबद्दल शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की ती वर्गात बोलत नाही . तिला involve नका करू. पण त्यावेळी माझ्या डोक्यात एकच विचार होता की हिला नक्की बोलते करायचे. आणि हेच उद्दिष्ट बनले माझे...! काही काळानंतर त्या मुलीच माझ्यासोबत इतकं पटायला लागलं की मी काहीही म्हटलं तरी ती माझं ऐकायची. पाण्याचा वापर आपण कशासाठी करतो हे एका सेशन च्या activity मध्ये तिने स्वतः समोर येऊन सांगितलं. हे सर्व बघून सर्व शिक्षक खूप आश्चर्यचकित झाले आणि हा क्षण बघून मी पण इमोशनल झाले आणि असं वाटल की खरंच प्रोजेक्ट अस्मिच्या सेशन्समुळे तिला खूप फायदा झाला. सर्व activity मध्ये ती सहभागी होत गेली. या सर्व गोष्टीवर शिक्षकांचा सुरुवातीला विश्वास बसेना. पण नंतर त्यांनी आमचं खूप कौतुक केलं.
सरीता माहुलीकर - ज्ञानप्रबोधिनी
Interns



Facilitators
अस्मिमध्ये काम करताना योगदान खरं तर मुलांच्या आयुष्यामध्ये आपण देतो का मला माहित नाही... पण आपल्या आयुष्यात त्यांचं फार मोठ योगदान आहे.. गाण्यावर नाच करताना किंवा गोष्ट ऐकताना त्यांचे डोळे जेव्हा एक टक आपल्याकडे बघत असतात तेव्हा मनोमन सार्थकता जाणवते.
अश्विनी बेल्हे


संसाराच्या रहाटगाड्यात आपण पिचलेले असतो. दिशा सापडत नसते. आपल्या व्यक्तिमत्त्वावर अनेक कृत्रिम थर चढलेले असतात. आपली ओळख हरवलेली असते. आणि अशातच जर एखादं काम मिळालं की ज्याने आपलं आयुष्य बदलून टाकलं, तर किती छान वाटतं! 2019 नोव्हेंबर मला अस्मिचं काम मिळालं. ते मी खूप मन लावून करायचा प्रयत्न करत होते. असं करता करता मला ते काम कधी आवडायला लागलं माझं मलाच कळलं नाही.
एकदा चौथीचे एक सेशन वाचल्यावर मला ते इतकं आवडलं की याचा आपल्या आयुष्याशी कुठे ताळमेळ लागतोय का हे मी शोधायला लागले आणि असं करत असतानाच पूर्वीची मी पुन्हा एकदा मला सापडले. माझी सुधारित आवृत्ती मला मिळाली. अर्जुनासाठी कृष्णाने जशी गीता सांगितली तसं माझ्यासाठी हे अस्मिच काम म्हणजे मला चालतं बोलतं ठेवणारी गीताच आहे. नकळतपणे मुलांच्या बरोबर त्यांच्या आईवडिलांकडून मिळणारा आदर असो किंवा मुलांनी आपुलकीने दिलेले स्नेहसंमेलनाचे आमंत्रण असो. प्रत्येक अनुभव सुखावणारा आहे. धन्यवाद अस्मि!
श्रावणी महेकर

प्रोजेक्ट अस्मिमध्ये काम करताना जसजसे आपण नवे सत्र घेतो तशी आपलीही उत्सुकता वाढत जाते.सत्र वाचायला सुरुवात केली की पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलतं की सत्र खूप विचारपूर्वक तयार केलं गेलं आहे.उदाहरणच द्यायचं झालं तर आमचं अस्मिचं 'झाडोबा' हे सत्र.निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावं, आदर निर्माण व्हावा हा त्या मागचा हेतू. प्रेम, आपुलकी, आदर, जिव्हाळा या सगळ्या भावना केव्हा निर्माण होतात जेव्हा एखादं नातं निर्माण होतं.
तेचं 'मित्रत्वाच' नातं हे सत्र निर्माण करतं.अस्मिनी हेतूपूर्वक हे सत्र श्रावण भाद्रपद अशा महिन्यांत ठेवलं आहे की जेव्हा निसर्ग ही मुक्त हस्ताने उधळण करत असतो.आपले सणवार ही आपल्याला निसर्गाच्या जवळ नेतात. याच कल्पनेचा धागा पकडून सत्र तयार केलं आहे.हेच प्रोजेक्ट अस्मिचं वेगळेपण आहे.
'तोत्तोचान' ही एका जपान मधील छोट्या मुलीची गोष्ट. जपानी शिक्षण पद्धतीमधील वेगळेपणा या पुस्तकामधून जाणवतो. अशाच पद्धतीने लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून प्रोजेक्ट अस्मिची सगळी सत्र तयार केली गेली आहेत. तोत्तोचानला जसं वाटायचं की आपल्या शाळेचं स्वतंत्र असं गाणं असावं तशीच प्रोजेक्ट अस्मिचीही स्वतंत्र अशी प्रार्थना आहे. कवयित्री आणि लेखिका विनिता तेलंग यांनी लिहिलेली. लहान मुलांना समजेल उमजेल आणि आपली वाटेल अशी ही प्रार्थना...
प्रत्येक देव हा आपल्याला काही शिकवण देतो. हे सर्व गुण माणसांमध्ये आले तर माणसाचाही देव होतो.अशा आशयाची प्रोजेक्ट अस्मिची प्रार्थना सोप्या शब्दांत मुलांना सकारात्मक विचार देऊन जाते.
कदाचित या प्रार्थनेचा मतितार्थ आत्ता मुलांना समजणार नाही पण त्याचा खोलवर झालेला संस्कार मात्र मुलांना त्यांच्या पुढील आयुष्यात नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
शिल्पा फडणीस कुलकर्णी

